पारनेर मध्ये युवा पत्रकाराला दमदाटी आणि मारहाण आमच्या नेत्याच्या विरोधात का बातम्या लावतो म्हणत केली मारहाण

पारनेर/प्रतिनिधी :
पत्रकारांवर हल्ले वाढत आहेत पारनेर मध्ये युवा पत्रकाराला मारहाण करण्यात आली आहे. पारनेर तालुक्यात वृत्त संकलनाचे काम करणारे मुंगशी येथील युवा पत्रकार प्रवीण करपे यांना स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या गणेश सोनुळे युवकाने शिवीगाळ करत मारहाण केली आहे या विरोधात प्रवीण करपे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारीमध्ये प्रवीण करपे यांनी असे म्हटले आहे की मी वृत्तपत्रामध्ये व ऑनलाइन न्यूज पोर्टलच्या माध्यमातून बातम्या संकलन करण्याचे काम करतो.


दि. १८ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ७ वा. सुमारास मी माझेकडील फॅसिनो स्कुटी नं- एमएच- १६-डीबी- ९५९८ यावरून पारनेर येथुन मुंगशीकडे पारनेर ते सुपा रोडने निघालो होतो. मी पारनेरकडुन गणपती फाटामार्गे मुंगशीकडे जात असताना रात्री साडेसात वाजताच्या सुमारास गणपती फाटा येथे रोडवर माझे ओळखीचा गणेश सोनुळे हा दोन्ही हात लांब करुन माझे मोपेडला आडवा येवुन थांबल्याने मी मोपेड थांबवली. त्यावेळी त्याने मला तु लई मोठा झालाय का ? तु खुप मोठया बातम्या देतोय असे म्हणुन मला हाताने मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केली. मला मारहाण होत असल्याने मी मोपेड चालु करुन पुन्हा पारनेरकडे येण्यासठी निघालो असता त्याने माझी गाडी पकडुन रोडवर पाडली. त्यानंतर मी मोपेड चालु करुन पारनेरला येवुन तक्रार देण्याकरीता पोलीस स्टेशन मध्ये आलो असे सांगितले ही घटना ऐकून पारनेर पोलिसांनी ३४१, ३२३, ५०४, ५०६ या कलमाच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.
प्रवीण करपे यांना मारहाण झाली ही घटना कुठेतरी लोकशाहीला विघातक आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे. अतिशय चुकीच्या पद्धतीने प्रवीण करपे यांच्यासोबत वर्तन झाले आहे.
प्रवीण करपे यांनी आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना असे सांगितले की गणेश सोनुळे आणि माझा कोणत्याही प्रकारे वाद नव्हता परंतु त्याने माझ्याशी हुज्जत घालत मला मारहाण केली आणि असे म्हटले की तू आमच्या नेत्याच्या विरोधात का बातम्या टाकतो तू लय मोठा पत्रकार झाला आहे. का अशा पद्धतीची भाषा वापरल्याची सुद्धा प्रवीण करपे यांनी पत्रकार सहकार्यांना माहिती देताना सांगितले.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e