सोनगीरसह परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वीजपंप चोरट्यांना अटक

येथील पोलिसांनी शेतविहिरीतील वीजपंप (जलपरी) चोरणाऱ्या दोन संशयितांना पकडले असून, चोरटे व चोरीचा माल घेणाऱ्यांची मोठी टोळी जेरबंद होण्याची शक्यता आहे. शनिवारी (ता. ५) चोरट्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. सोनगीर व परिसरात शेतीपंप चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. शेतकरी अक्षरशः त्रस्त झाले होते.
कावठी (ता. धुळे) येथील गजेंद्र सुकलाल शिंदे यांच्या शेतातील तसेच शेजारील तीन शेतकऱ्यांच्या विहिरीतील वीजपंप चोरीस गेल्याने येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तपास सुरू असताना नेर (ता. धुळे) येथून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत गोंदूर (ता. धुळे) येथील तीन संशयितांची नावे पुढे आली. त्यांना ताब्यात घेऊन कसून विचारपूस केली असता संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एक वीजपंप (जलपरी), दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. संशयितांनी काही जलपऱ्या धुळे मोगलाईतील भंगार व्यापारी इमरान शेख रऊफ यास विक्री केल्याचे सांगितले. त्याच्याकडून मागील गुन्ह्यातील चार वीजपंप ताब्यात घेण्यात आले. सर्व पाच वीजपंपांची किंमत सुमारे ३२ हजार रुपये आहे.
संशयित वासुदेव प्रकाश भिल (वय ३०) व राम गुलाब पवार (१९, दोघे रा. नगाव रोड, भिलाटी गोंदूर, ता. धुळे) यांना अटक करण्यात आली. दोघांनी आकाश विकास पवार (रा. गोंदूर) याच्या मदतीने कावठी, मेहेरगाव, सैताळे, चिंचवार, गोंदूर, मोराणे आदी शिवारातून अनेक वीजपंप चोरी केल्याचे सांगितले.दोन्ही संशयितांना अटक होऊन दोन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर झाली. इतर तीन संशयित विधिसंघर्षित बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश फड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक किरण राजपूत, पोलिस नाईक राहुल सानप, सूरज सावळे, उन्मेश आळदे, अमरिश सानप यांनी कारवाईत सहभाग घेतला. सहाय्यक उपनिरीक्षक रवींद्र राठोड तपास करीत आहेत

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e