ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांच्या विशेष पथकाने ४ सप्टेंबरला मध्यरात्री केली. यात बायोडिझेलसह विविध साहित्य असा सुमारे १५ लाख ३३ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त केला.डॉ. शेखर-पाटील यांच्या विशेष पथकातील रवींद्र सुरूपसिंग पाडवी यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दोंडाईचा शहरातील धुळे बायपास रोडवर इंडियन ऑइल पेट्रोलपंपाशेजारी जमिनीत खड्डा करून ट्रक (एमएच २०, डीई ५०८८)मध्ये बायोडिझेलसदृश द्रव भरले जात असतानाच पकडले.
याशिवाय लोखंडाची टाकी, प्लॅस्टिकच्या पाइपासह विविध साहित्य असा १५ लाख ३३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पकडला. अंधाराचा फायदा घेऊन दोन संशयित फरारी झाले. या प्रकरणी बाळू गंगाधर जोशी (रा. डाबरी घरकुल, दोंडाईचा), शेख सलीम मोहम्मद यासीन, शेख अबरार शेख सलीम (दोघे रा. कैसर कॉलनी, शहागंजजवळ, छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह पाच जणांविरुद्ध दोंडाईचा पोलिस ठाण्यात पाच जणांवर ५ सप्टेंबरला सायंकाळी गुन्हा दाखल झाला.
0 Comments