नाशिक जिल्ह्यातील ग्रामिण भागात सुरू असलेल्या हातभट्टी व्यावसायिकांचे उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण जिल्हा पोलिस प्रमुखांनी स्थापन केलेल्या ४ पथकातील महिला पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कामगिरी सिध्द केली आहे. या पथकाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३२ हातभट्टीचे अड्डे उध्वस्त केले
या चार पथकांत आठ महिला अंमलदारांचा समावेश आहे. या सर्व पथकांचे नेतृत्व अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे देण्यात आले आहे. या पथकाने इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खेडभैरव, देवाचीवाडी, पिंपळगाव घाडगा, चिंचलेखैरे, देवळे आणि तळेगाव या दुर्गम भागांतील गावठी दारू हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.
याप्रकरणी ३२ संशयितांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. आता पर्यंत जवळपास १२ लाख रुपयांचे हातभट्टी दारु, रसायन व साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या महिला पथकाने आता पर्यंत केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
0 Comments