माझे आयुष्य खूप खडतर झाले आहे. माझा पती नेहमी माझ्यावर ओरडत असतो. माझा अपमान करत असतो. माझ्यावर कधी कधी हातही उगारतो. मला वाटते की मी एका अत्यंत वाईट संसारात अडकली आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मी त्याच्याशी प्रेमविवाह केला आहे. माझ्या घरचे या लग्नासाठी अजिबात तयार नव्हते. त्यांना या मुलासोबत माझे भविष्य अंधकारमय वाटत होते. पण तरी त्यांचे न ऐकता मी हा विवाह केला कारण मला त्याच्यावर विश्वास होता.
पण लग्नानंतर माझा हा विश्वास खोटा ठरला आणि एक नरकमय आयुष्य माझ्या वाट्याला आले. आता मला माझी चुकी समजली असून मला या संसारातून बाहेर पडायचे आहे. मात्र पुन्हा माझ्या माहेरी जाण्याचे माझे धैर्य नाही. मी अतिशय परंपरावादी कुटुंबातील आहे. कृपया मला मार्गदर्शन करा
गुरुग्राम येथील आर्टेमिस हॉस्पिटलच्या मानसशास्त्र विभागाच्या एचओडी डॉ रचना खन्ना सिंग म्हणतात की, तुम्ही सध्या किती कठीण प्रसंगातून जात आहात हे मी समजू शकते. पण ही वेळ संयम गमावण्याची नसून धीर धरण्याची आहे. तुमचे त्याच्यावर खूप प्रेम असल्याने साहजिकत्याचा अत्याचार ओळखणे तुम्हाला कठीण झाले असेल. तुम्ही खूप सहन केले असेलपण तरीही नात्याबाबत कोणाही निर्णय घेताना घाई न करणे उत्तम!
तुम्ही सर्वात आधी तर तुमच्या पतीशी स्पष्टपणे बोलले पाहिजे की अशा प्रकारचे वर्तन तुम्हाला मान्य नाही. तुम्ही त्याला त्याच्या चुका दाखवून दिल्या पाहिजेत. तुम्ही त्याच्यात काय बघून त्याच्याशी लग्न केले होते ते त्याला जाणवून दिलं पाहिजे. यामुळे कदाचित त्याच्यामध्ये फरक पडू शकतो.
तुमचा पती तुमच्याशी असं का वागतो हे देखील जाणून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तुमची एक बाजू आहे शीच तुमच्या पतीची देखील एक बाजू असू शकते. जी त्याच्या या वर्तनाला कारणीभूत असण्याची शक्यता आहे. ती जाणून घेऊन. त्यावर विचार करा.
संसाराबाबत कोणाही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही एकदा कौन्सिलरची मदत अवश्य घ्या. कारण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला स्वत:ला सांगता येते व समजावून सांगता येणे शक्य नाही. त्या गोष्टी कौन्सिलर योग्य प्रकारे समजावू शकतात. त्यामुळे तुम्ही पती आणि पत्नीने एकदा उत्तम कौन्सिलरची मदत घेऊन या प्रकारावर तोडगा नक्की काढावा.
0 Comments