गिरीश महाजन यांच्या विरोधात अपशब्द; पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


 मराठा आंदोलन सुरु असताना मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात अपशब्द वापरत त्याची वादग्रस्त  पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. पोस्ट व्हायरल करणाऱ्या ईसमाविरोधात धुळे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

राज्याचे मंत्री गिरीश महाजन हे जालना येथे सुरु असलेल्या मराठा आंदोलनाच्या ठिकाणी गेले होते. यात गिरीश महाजन यांच्या विरोधात अपशब्द वापरत जालना येथील मराठा आंदोलक जरांगे पाटील यांना विनंती करणारी पोस्ट एका इसमाने व्हायरल केली होती. अपशब्द वापरत वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणाऱ्या ईसमा विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या पोस्टमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या बद्दल  अपशब्द वापरण्यात आले होते. संबंधिता विरोधामध्ये धुळे शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये सदर ईसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत आहेत.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e