नंदुरबार येथे आदिवासी वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या अडचणी समजून घेताना ते बोलत होते. तहसीलदार नितीन गर्जे, नंदुरबार पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी नितीन कापडणीस व विविध यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री डॉ. म्हणाले, की नंदुरबार शहरातील ज्या आदिवासी बांधवांकडे स्वत:चे घरकुल नाही त्यांनी संपूर्ण कागदपत्रांसह अर्ज केल्यास दिवाळीच्या आत त्यांना घरकुले मंजूर करण्याचा प्रयत्न आहे. ज्यांच्याकडे आधार, रेशन, आभा यांसारखी कार्डे व जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, बॅंक खाते नसणे यांसारख्या अडचणी असतील यासाठी स्वतंत्र ड्राइव्ह प्रशासनाच्या माध्यमातून घेऊन ती प्रत्येकाला देण्याची मोहीम सुरू आहे. यासाठी कुठल्याही आदिवासी बांधवालाकुठलेही शुल्क अथवा अनावश्यक पैसे द्यावे लागणार नसून अशा कागपत्रांसाठीचा लागणारा खर्च आदिवासी विकास विभागामार्फत केला जाणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी आपले रेशनकार्ड स्वतंत्र केले नसेल ते स्वतंत्र करावेत, आधार, बॅंक खाते यांसारख्या विविध जीवनोपयोगी दस्तावेज प्राप्त करून घ्यावा. ज्यांच्याकडे ही स्वतंत्र कागदपत्रे नाहीत त्यांनी कुठल्याही घरकुल अथवा वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ होणार नाही, असेही त्यांनी सांगितले
पालकमंत्र्यांच्या प्रशासनास सूचना-घरकुलासोबत आदिवासी वस्त्यांवर रोजगार व व्यवसाय निर्मितीलाही चालना द्या.-कौशल्यावर आधारित रोजगारनिर्मितीसाठी व अनुकूल व्यवसाय उभारण्यासाठी शासनामार्फत मदत.-आदिवासी वस्त्यांमधील साफसफाई, विद्युतीकरण, रस्त्यांच्या डागडुजीची कामे तातडीने पूर्ण करावीत.-एकही नागरिक मूलभूत गरजांपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी पालिका व तालुका प्रशासनाने घ्यावी.
0 Comments