इंदिरा गार्डन परिसरातील आदर्शनगरातील आदिशक्ती कानुश्री विद्यालयाच्या कंपाउंडमधील मनपाच्या मालकीच्या आठ वृक्षांची बेकायदेशीरीत्या वृक्षतोड केल्याबद्दल मुख्याध्यापक कुणाल अशोक माळी (रा. कापडणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. वृक्षतोडीबाबत श्री. काकुस्ते यांची तक्रार आयुक्त दगडे-पाटील यांना प्राप्त झाली.या प्रकरणी आदर्शनगरमधील जागरूक सामाजिक कार्यकर्ते दीपक हरी काकुस्ते यांच्या पाठपुराव्यानंतर वृक्षतोडीचा प्रकार उजेडात आला.
याअनुषंगाने चौकशीअंती गुन्हा दाखल करण्याचा आदेश प्रभारी वृक्ष अधिकारी रविकिरण पाटकरी यांना दिला होता.विद्यालयात २३ ऑगस्टला दुपारी अडीचच्या सुमारास आठ वृक्षांची मुळापासून कत्तल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. महापालिकेची परवानगी न घेता ही वृक्षतोड झाली. तरतुदीनुसार फौजदारी कारवाई झाली. विद्यालयात अनेक वर्षांपासूनची कपोळ, लिंब, नारळ, करंज, बदाम, अशा वृक्षांची कत्तल झाली.
0 Comments