आदित्य-L1 च लॉन्चिंग यशस्वी, नव्या इतिहासाच्या दिशेने सुरु झाला ISRO चा प्रवास

आजपासून भारताची सूर्य मोहिम सुरु झाली आहे. हे भारताच पहिलं सौर मिशन आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर सगळ्यांच्या नजरा आदित्य एल 1 मिशनकडे लागल्या होत्या. चांद्रयान-3 प्रमाणेच आदित्य मिशनकडून यशाची अपेक्षा आहे.
हैदराबाद : चांद्रयान-3 च्या यशानंतर आजपासून भारताच्या आदित्य एल-1 मिशनला प्रारंभ झाला. भारताची ही पहिली सूर्य मोहीम  आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन आदित्य एल-1 मिशन लॉन्च झालं. PSLV-C57 रॉकेटद्वारे आदित्य एल-1  सॅटलाइट पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये सोडण्यात आलं. सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी उपग्रहाचे लॉन्चिंग झालं. चांद्रयान-3 च्या यशानंतर सध्या संपूर्ण देशामध्ये उत्साहाच वातावरण आहे. इस्रोच्या वैज्ञानिकांनी कमाल केली. त्यामुळे आदित्य एल-1 मिशनकडून बऱ्याच अपेक्षा वाढल्या आहेत. 23 ऑगस्टला चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केलं होतं. भारताने या मिशनद्वारे इतिहास रचला होता
चांद्रयान-3 च्या यशानंतर भारत आता सूर्य मिशनसाठी सज्ज आहे. सूर्याबद्दल बरीच माहिती या मिशनद्वारे मिळणार आहे. त्यामुळे देशवासियांच्या नजरा आज होणाऱ्या आदित्य एल-1 च्या लॉन्चिंगकडे लागल्या होत्या. आदित्य एल-1 सूर्याभोवती भ्रमण करुन सूर्याबद्दलची माहिती गोळा करणार आहे. भारताच चांद्रयान-3 मिशन आता अंतिम टप्प्यात आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरच चंद्रावर वेगात संशोधन कार्य सुरु आहे. चंद्राबद्दलची बरीच महत्त्वाची माहिती विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरकडून मिळाली आहे. आता तशीच अपेक्षा आदित्य एल-1 कडून आहे

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e