पोलिस अधीक्षक बारकुंड म्हणाले, की चौकशीकामी पत्र दिले असता आमदार शाह यांच्या सांगण्यानुसार नाशिक नको, धुळ्यात चौकशी व्हावी, धुळ्यात चौकशीस बोलविले तर मंगळवारी (ता. ३१) उपस्थित राहणे शक्य नसून ४ नोव्हेंबरला येतो, असे त्यांनी कळविले आहे.आमदारांचे ३४ अर्जआमदार शाह यांनी जून २०२१ ते जुलै २०२३ पर्यंत पोलिस प्रशासनाविरोधात तक्रारींचे ३४ अर्ज दिले. त्यावर चौकशीअंती तथ्य आढळलेले नाही, असा अहवाल शासनाला पाठविला आहे. या कालावधीत असलेल्या प्रत्येक पोलिस अधीक्षकांकडे त्यांनी एकसारखा तक्रार अर्ज दिला, त्यात केवळ पोलिस अधिकाऱ्याचे नाव बदलले आहे.या प्रकारासह चौकशीकामी उपस्थित न राहणे यातून आमदार शाह यांच्याकडून पोलिस प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न दिसतो. अर्जदाराकडून पोलिसांना त्रास व्हावा, पोलिसांवर आपलाच वचक राहावा, असे त्यांच्या कृतीतून दिसून येते.अर्जात मोघम मुद्देआमदार शाह यांच्या तक्रार अर्जात मोघम, सुस्पष्ट असे मुद्दे दिसत नाहीत. जिल्हा पोलिस अधीक्षक कर्तव्य बजावत नाहीत, असे आमदारांचे म्हणणे आहे; परंतु वर्षभराच्या अखेरीस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवलेला नाही. क्राइम कंट्रोलमध्ये आहे
त्यामुळे आमदारांच्या आरोपांचे खंडन करतो, असे सांगत पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी आमदार शाह यांच्यावर प्राप्त फिर्यादीनुसार एक गुन्हा दाखल केल्याने त्यांच्याकडून पोलिस प्रशासनावर आरोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पोलिसांवर दबाव नाहीपोलिसांपुढे कुठलाही पक्ष, गट-तट समान असतात. कायद्यापुढे सर्व समान असतात. त्यामुळे कुणाच्या दबावाखाली कामकाज करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ड्रग्जमाफिया ललित पाटील याच्या नाशिक शहरातील प्रकरणाबाबत आमदार शाह यांनी तपास यंत्रणेला पुरावे द्यावेत. धुळे जिल्हा पोलिस प्रशासनाकडेही पुरावे उघड केल्यास हरकत नाही, अशी भूमिका श्री. बारकुंड यांनी मांडली.फिर्यादीचीच मागणीचाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात टिपू सुलतान स्मारक प्रकरणी १९ जूनला फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला. त्यात तणाव निर्माण करण्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर फिर्यादीने पोलिस प्रशासनास दिलेले निवेदन व त्याच्या पुरवणी जबाबानंतर कलम १२० ब, ४०९ व लाचलुचपत प्रतिबंधक कलम सातअन्वये, अशी तीन कलमे वाढविण्यात आली आहेत. या प्रकरणी पोलिस उपअधीक्षकांकडून तपास सुरू आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाचा दबाव असण्याचा प्रश्नच येत नाही, असेही पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी स्पष्ट केले.गुन्हे शाबीतचा दर अधिकगेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्हे शाबीत होण्याचा दर अधिक आहे. मालमत्तेविरुद्धचे गुन्हे, तसेच खून, हाणामारी, त्यात जखमा आदी गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. जुगार, दारूबंदी आदी गुन्ह्यांबाबत वेळोवेळी कारवाई झालेली असल्याचे अभिलेखात नोंदलेले आहे, असेही श्री. बारकुंड यांनी सांगितले
0 Comments