मध्यप्रदेशच्या धरोली गावात राहणाऱ्या मीरा नावाच्या महिलेचे तिच्याच दिरासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधाची नवऱ्याला काही एक कल्पना नव्हती. कारण मीरा दररोज नवऱ्याला झोपेचे औषध मिसळले दुध प्यायला द्यायची. या दुधामुळे पती गाढ झोपी जायचा. यानंतर घरात दिराची एन्ट्री व्हायची आणि त्यांचे अनैतिक संबंध सुरु असायचे
गेल्या 27 सप्टेंबरला असेच मीराने तिच्या पतीला नेहमीप्रमाणे झोपेचे औषध मिसळले दुध प्यायला दिले. हे दुध पिऊन नवरा झोपी गेला होता. त्यानंतर नेहमीप्रमाणे मीराने दिराला घरात बोलावून घेतले. यावेळी घरात मीरा आणि तिच्या दिराचे अश्लील चाळे सुरु असतानाच अचानक नवऱ्याला जाग आली. यावेळी नवरा त्याच्याच खोलील बायकोला दिरासोबत पाहतो. हे संपूर्ण दृष्य पाहून नवऱ्याला पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय येतो आणि तो या घटनेला विरोध करू लागतो.
दरम्यान मीराचे पितळ उघड पडताच ती दिरासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचते. त्यानुसार दीर आणि बायको मिळून नवऱ्याचे हात-पाय दोरीने बांधतात आणि त्याच्या तोंडात बोळा कोंबतात, जेणेकरून तो आरडाओरड करू नये. यानंतर बायको प्रियकरासह मिळून नवऱ्याला विजेचा शॉक देऊन त्याची हत्या करते. शिवराज असे तिच्या पतीचे नाव होते.विशेष म्हणजे घरात हा संपूर्ण घटनाक्रम घडत असतात शिवराजचा 4 वर्षाचा मुलगा घटनास्थळी उपस्थित होता.
दरम्यान शिवराजच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी यावर संशय व्यक्त केला होता. शिवराजचा मृत्यू झाला नसून त्याची हत्या झाल्याचे शिवराजच्या वडिलांनी पोलिसांनी सांगितले होते. तसेच शिवराजच्या या हत्येत वडिलांनी सुनेवर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी वडिलांच्या तक्रारीवरून आणि मुलाच्या जबाबावरून बायको मीरा आणि प्रियकर दीराला अटक केली
प्रकरणी अतिरीक्त पोलीस अधिक्षक अमृत मीणा यांनी सांगितले की, शिवराजच्या मृत्यूवर त्याच्या वडिलांनी संशय व्यक्त केला होता. माझ्या मुलाचा मृत्यू नव्हे तर हत्या झाल्याचा सूनेवर संशय व्यक्त केला होता. या संशयातून आणि मुलाच्या जबाबातून मीरा आणि तिच्या दीराला अटक केली. या दोघांनाही पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी शिवराजच्या हत्येची कबूली दिली आहे
0 Comments