धुळे: मागील साधारण १५ दिवसांमध्ये धुळे जिल्ह्यातील काही चिमुकल्यांचा तापाने फणफणून मृत्यू झाला आहे. डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याचे कारण पालकांकडून सांगितले जात आहे. एकाही रुग्णाच्या नातेवाइकांकडे डेंग्यू पॉझिटिव्हचा रिपोर्ट नाही आहे. मात्र चिमुकल्यांच्या मृत्यूचे कारण काहीही असले तरी जिल्हाभरातील खासगी तसेच सरकारी रुग्णालयात उपचारासाठी तोबा गर्दी आहे. चिमुकले वाढत्या तापाचे बळी ठरत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
धुळे महानगरपालिकेने डेंगू मलेरिया आणि इतर साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी जे काही उपाययोजना करायची होती ती केली नाही. त्यामुळे धुळे शहरातील डेंगूच्या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धुळे शहरात डेंगूच्या आजारामुळे अनेक मृत्यू झाले आहे. या मृत्यूला धुळे महानगरपालिका जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी केला आहे. तसेच या डेंगूच्या आजारामुळे आज धुळे शहरातील युवा उद्योजक गौरव जगताप यांचा देखील मृत्यू झाल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
केवळ जगताप परिवारासाठीच नव्हेतर संबंध धूळेकरांसाठी धार्मिक, अध्यात्मिक वृत्तीच्या लोकांसाठी धक्कादायक काळजाला चटका लावणारी दुखद घटना आज घडली आहे. धुळ्यातील धर्मयोद्धा तथा युवा उद्योजग म्हणून ओळख असलेले गौरव जगताप यांचा डेंग्युने बळी घेतला. हा बळी डेंग्यूने घेतला नसून धुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने घेतल्याच्या संतप्त भावना धुळेकरांकडून व्यक्त केल्या जात आहे. महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास उद्योजक गौरव जगताप यांचे नाशिक येथे निधन झाले. आज दुपारच्या सुमारास त्यांच्यावर साश्रु नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. युवा उद्योजग गौरव जगताप यांच्या मृत्यूने त्यांचा मित्र परिवार चांगलाच खचला आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दुःखाला डोळ्यांच्या अश्रूंमधून वाट करुन देत असतानाच या लोकांच्या डोळ्यांमध्ये धुळे महापालिकेच्या भोंगळ कारभाराप्रती प्रचंड संतापही दिसत होता. धुळे महानगरपालिकेने डेंग्यू आजारासंदर्भात वेळीच आपले कर्तव्य बजावले असते तर धुळ्यात युवा उद्योजग गौरव जगताप यांच्यासह इतर रुग्णांचा निष्पाप बळी गेला नसता अशा भावना देखील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
0 Comments