बीड जिल्ह्यातल्या आष्टीत विवस्त्र महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आष्टी तालुक्यातल्या वाळूजमध्ये जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचं समोर आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
स्थानिक राजकारण्याच्या कुटुंबियांनी महिलेच्या कुटुंबाच्या जमिनीवर दावा सांगितल्याने निर्माण झालेल्या वादातून महिलेचे कपडे फाटले अशी माहिती समोर येत आहे. मात्र, पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तक्रारदार महिलेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे.
0 Comments