दरखेडा गावालगत असलेल्या बुराई नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक थांबविण्याबाबतची तक्रार दरखेडा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने गुरुवारी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील, अव्वल कारकून संजय राणे, मंडळ अधिकारी नीलेश मोरे व अवैध गौणखनिज भरारी पथक यांनी पाहणी केली असता दहा हजार ब्रास अवैध वाळू उत्खनन व वाहतूक केल्याचा पंचनामा दरखेडा ग्रामस्थांसमक्ष करण्यात आला.
त्यामुळे दहा हजार ब्रास अवैधरीत्या वाळू उत्खनन करून वाहतुकीबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार २२ कोटी २८ लाख ६६ हजार ८०० रुपये दंड आकारण्याची नोटीस माजी सरपंच विलास निंबा शिंदे यांना बजावण्यात आली.नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत समक्ष हजर राहून खुलासा करण्याचे आदेश नोटिशीत देण्यात आले आहेत.
0 Comments