अवैध गोमांस वाहतूक सोनगीर येथे पकडली

मुंबई-आग्रा महामार्गावरील येथील टोलप्लाझावर जनावरांचे मांस अवैधरीत्या वाहतूक व विक्रीसाठी नेणाऱ्या एका टाटा ४०७ वाहनास गोरक्षकांनी पकडले. अडीच लाख रुपयांचे अडीच टन मांस तसेच अडीच लाखांचे वाहन असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे
धुळ्याकडे जाणाऱ्या टाटा वाहन (एमएच ३४, २५७८) यात जनावरांचे मास अवैधरीत्या वाहतूक व विक्रीस जात असताना गोरक्षकांनी रोखून पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी संशयित चालक शेख शोएब शेख अख्तर (वय २२, रा. सिल्लोड, स्नेहनगर, जि. औरंगाबाद) व शेरखाँ खलीलखाँ पठाण (३४, रा. अशरफनगर, दोंडाईचा, ता. शिंदखेडा, जि. धुळे), रोशन कुरेशी, पप्पू कुरेशी (दोघे रा. दोंडाईचा) यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, चालकासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, विभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पोलिस नाईक ईश्वर सोनवणे, पोलिस शिपाई संजय जाधव, विजयसिंग पाटील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e