धुळे जिल्हा ऊसतोड ठेकेदाराची १८ लाखात गंडा

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील बादलकोट येथील ऊसतोड ठेकेदाराला तब्बल 18 लाखात गंडविण्यात आले. ऊसतोड मजुर न पुरविता साक्री तालुक्यातील दोघांनी त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ऊसतोड ठेकेदार बलभिम हनुमंत गव्हाणे (वय 33 रा. बादलकोट) यांनी काल पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार, महेंद्र आप्पा मालचे व धिरज चिंधु सोनवणे (रा. जांभोरा ता. साक्री) या दोघांनी तुम्हाला ऊसतोड वाहतुकीसाठी मजुर पुरवितो, असे सांगत विश्वाससंपादन केला. त्यानंतर महेंद्र मालचे याने 11 लाख रूपये व धिरज सोनवणे याने 7 लाख रूपये घेवून ऊसतोड मजुर न पुरविता तसेच पैसे परत न देता फसवणूक केली. हा प्रकार दि. 30 जुलै 2023 पासून देत आजपर्यंत घडला. गुन्ह्याचा तपास पीएसआय विशाल पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e