सामाजिक कार्यकर्त्याचा मृतदेह आढळला, पत्नीचा एक संशय अन् भयंकर गुन्ह्याचा उलगडा

नांदेडमधील एका हत्येचा ३७ दिवसानंतर अखेर उलघडा झाला आहे. खोटे गुन्हे दाखलची धमकी देत होता म्हणून त्यांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पत्नीच्या संशयाने तपासाला दिशा मिळाली.
नांदेड: किनवट तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश मस्के यांचा महिन्या भरापूर्वी मृतदेह आढळून आला होता. तब्ब्ल ३८ दिवसानंतर या घटनेत धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याच्या कारणाने मस्के यांचा खून करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा उलघडा करत तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
मयत सुरेश मस्के हे सामाजिक कार्यकर्ते सोबतच माहिती अधिकार कार्यकर्ते देखील होते. १४ ऑक्टोबर रोजी मस्के यांचा हमाल कॉलोनी परिसरात मृतदेह आढळला होता. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. दारूच्या नशेत गाडी स्लीप झाल्याने मस्के यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात होता. या प्रकरणी किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला. मात्र, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या पत्नीने व्यक्त केला होता. याबाबत त्यांच्या पत्नीने पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले होते.
त्यानुसार, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांना तपास करण्याचे आदेश दिले. गुंतागुंतीच्या या प्रकरणात पोलिसांनी बारकाईने तपास करून ३७ दिवसानंतर प्रकरणाचा उलघडा केला. पोलिस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याने शेख आवेज उर्फ अबू शेख शादुल्ला ( वय २२ रा. हमाल कॉलोनी, किनवट ), शेख अशफाक शेख हसन (वय २०, हमाल कॉलोनी, किनवट ), शेख रिहान आदिनी सुरेश मस्के यांचा खून केल्याचं उघड झालं.
मयत सुरेश मस्के याचे आरोपी शेख रिहान याच्या वडिलांसोबत वाद झाला होता. त्यातून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी मस्के यांनी दिली होती. परिसरात दादागिरी करत होता, याचं कारणाने आरोपीने सुरेश मस्के यांचा खून केला. विशेष म्हणजे आरोपी पाळत ठेवून मस्के यांचा खून केला. आरोपींना किनवट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e