पत्नी पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. पतीने पत्नीशी जे वर्तन केलं ते ऐकून कुणालाही चिडच येईल. तसंच महाभारताचीही आठवण येईल. कारण जुगारात हा माणूस सगळं काही हरला अखेर त्याने त्याच्या पत्नीलाही जुगाराच्या पणाला लावलं. मात्र तो डावही त्याला जिंकता आला नाही. त्याने आपल्या पत्नीला दिल्लीत तसंच सोडून दिलं आणि घरी निघून आला. ही घटना पीडित महिलेच्या भावाला कळली तेव्हा तो दिल्लीला गेला आणि त्याने बहिणीला सोडवलं.
उत्तर प्रदेशातल्या अमरोहामधलं हे प्रकरण आहे. या महिलेला सोडवून आणण्यात आलं तेव्हाही तिच्या अडचणी संपल्या नाहीत. कारण तिला तिच्या भावाने जेव्हा पतीच्या घरी पाठवलं तेव्हा या महिलेच्या दिराने तिच्याशी गैरवर्तन केलं. या प्रकरणी आता या पीडित महिलेने पती आणि दिराविरोधात पोलिसात धाव घेतली आहे. सध्या ही पीडिता तिच्या माहेरीच राहते आहे.
0 Comments