नंदुरबारचे तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या अडचणीत वाढ; अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

सत्र न्यायाधीश आर. जी. मलशेट्टी यांच्या न्यायालयात या प्रकरणी दोन दिवसापांसून सुनावणी सुरु होती
नंदुरबार – बनावट दस्ताद्वारे आदेश देत शासनाचा १० कोटी ८२ लाख ६४ हजार २२० रुपयांचा महसूल बुडविणारे तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. नायब तहसीलदार (महसूल) गवांदे यांनी शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठांच्या आदेशावरुन तत्कालीन जिल्हाधिकारी मंजुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे
काही धनदांडग्यांना फायदा करुन देण्यासाठी शासकीय नियमांचे उल्लंघन व कायद्यातील तरतुदींचा भंग करुन बनावट दस्त करुन यंत्रणेकडून कुठलीही मोजदाद न करता नजराणा भरुन घेत मंजुळे यांनी शासनाचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका आहे. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेचे किरणकुमार खेडकर तपास करत आहेत. या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी मंजुळे यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेण्यात आली होती.
सत्र न्यायाधीश आर. जी. मलशेट्टी यांच्या न्यायालयात या प्रकरणी दोन दिवसापांसून सुनावणी सुरु होती. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील विनोद गोसावी यांनी बाजू मांडली. मंजुळे यांनी इतरांच्या संगनमताने अफरातफर केली असून त्यांना अटक झाल्यास इतरही संशयितांची नावे पुढे येतील, असा युक्तिवाद त्यांनी केली. जिल्हा सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने मंजुळे यांचा अर्ज फेटाळला

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e