पाच लाखाची लाच; गटविकास अधिकारी एसीबीच्या ताब्यात

जळगाव : दिवाळीच्या सुट्या असताना या काळात लाच घेण्याचा प्रकार उघड झाला आहे. चौकशीतून मुक्त करण्यासाठी तब्बल पाच लाखाची लाच स्वीकारताना जळगाव पंचायत समितीतील येथील सहाय्यक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे 
दिवाळीनिमित्ताने सर्वच शासकीय कार्यालयांना सुट्या आहेत. पाडव्याची सुटी असताना पाडव्याच्याच दिवशी शासकीय कार्यालयात एसीबीच्या पथकाने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. जामनेर तालुक्यातील तक्रारदार हे लोकसेवक असून त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशी समितीमध्ये (Jalgaon ACB) आरोपी तथा विस्तार अधिकारी सध्या सहाय्यक गटविकास अधिकारी अधिकारी असलेले रवींद्र शालिग्राम सपकाळे (वय ५४) व विस्तार अधिकारी बुधा अहिरे (वय ५३) हे चौकशी पथकातील प्रमुख आहेत. तुम्हाला चौकशीतून दोषमुक्त करतो, तुमचा अहवाल चांगला पाठवितो. (ACB) त्यासाठी आम्हाला पाच लाख रुपये लागतील, अशी मागणी केली. 
सुटीच्या दिवशी यघडले कार्यालय 
लाच रक्कम देण्याचे निश्चित झाल्यानंतर लाचखोरांनी दिवाळी पाडव्याचा शासकीय सुट्टीचा दिवस लाच स्वीकारण्यासाठी निवडला. एरव्ही सर्वत्र शासकीय सुटी असताना लाचखोरांनी पंचायत समितीचे कार्यालय उघडून तक्रारदाराकडून लाच स्वीकारली. लाच घेताच तक्रारदाराने इशारा केल्यावर एसीबीने लाचखोरांना अटक केली. लाचखोरांविरोधात जळगाव जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e