“महाराष्ट्र सरकारबद्दल तुझी वागणूक खूप कठोर…”, मनोज तिवारींनी कंगना रणौतला सुनावले खडे बोल

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायमच चर्चेत असते. ती अनेकदा विविध सामाजिक विषयावर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. तिची प्रत्येक पोस्ट ही चर्चेचा विषय ठरते. अनेकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगनाला ट्रोलही केले जाते. पण या कशाचाही विचार न करता कंगना उघडपणे तिचे मत मांडते. नुकतंच गायक आणि खासदार मनोज तिवारी यांनी कंगनाला एक सल्ला दिला आहे. ‘कंगनाने एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना थोडासा आदर ठेवला पाहिजे’, असे मनोज तिवारी म्हणाले.

कंगना रणौत ही नेहमीच भाजपला समर्थन देताना दिसते. ती अनेकदा तिच्या ट्विटद्वारे किंवा सोशल मीडियाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत असते. तर दुसरीकडे ती महाराष्ट्र सरकारवर सातत्याने टीका करताना दिसते. या संपूर्ण प्रकरणावरुनच मनोज तिवारी यांनी कंगनाला खडे बोल सुनावले आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e