रेशन कार्डद्वारे
(Ration Card) सरकार आपल्या राज्यातील गरजू, गरीब कुटुंबियांना धान्य देते. अनेकदा रेशन कार्ड अपडेट
(Ration card holder) करण्यासाठी किंवा डुप्लिकेट कॉपी बनवण्यासाठी किंवा नव्या रेशन कार्डसाठी अर्ज करताना
(How to apply ration card) समस्या येतात. अशात सरकार आपल्या डिजीटल इंडिया अभियानांतर्गत समस्या सोडवत आहे.तुम्ही रेशन कार्डसंबंधी सेवांसाठी तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटरमध्ये
(CSC) माहिती घेऊ शकता. याबाबत डिजीटल इंडियाने एका ट्विटद्वारे माहिती दिली आहे. कॉमन सर्विस सेंटर सुविधाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागासोबत सामंजस्य करार केला आहे.देशभरातील 3.70 लाख CSC मार्फत रेशन कार्ड सेवा उपलब्ध करुन दिली जाईल. या भागीदारीचा देशभरातील 23.64 कोटीहून अधिक रेशन कार्डधारकांना फायदा होईल.
याअंतर्गत कोणत्या सेवा मिळणार -- कॉमन सर्विस सेंटरद्वारे रेशन कार्डचे तपशील अपडेट केले जाऊ शकतात.
- इथे आधार सीडिंगही करता येईल.
- रेशन कार्डची डुप्लिकेट प्रिंटही काढता येते.
- रेशन कार्डच्या उपलब्धतेबाबत माहिती करुन घेऊ शकता.
- रेशन कार्डसंबंधी तक्रारी कॉमन सर्विस सेंटरद्वारे करू शकता.
- रेशन कार्ड हरवल्यास नव्या रेशन कार्डसाठी अर्जही करू शकता.
0 Comments