जालना : रात्री लघुशंका करण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणीवर बलात्कार!

 जालना: लघुशंकेसाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणीला उचलून घेऊन जाऊन बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नराधम आरोपी फरार झाला असून भोकरदन तालुक्यातील टाकळी हिवर्डी येथे घडली आहे.

रात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेलेल्या 18 वर्षाच्या तरुणीला उचलून घेऊन जाऊन आरोपीने तरुणीवर बलात्कार केलाय. भोकरदन तालुक्यातील टाकळी हिवर्डी येथे ही घटना घडलीय. समाधान पालोदे असं बलात्कारी आरोपीचं नाव आहे.

या प्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे. काल रात्री 11 ते 11.30 वाजेच्या दरम्यान ही घटना घडलीय. टाकळी हिवर्डी येथील 18 वर्षाची तरुणी लघुशंकेसाठी घराच्या पाठीमागील बाजूस गेलेली असताना आरोपी समाधान पालोदे याने या तरुणीला उचलून घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेची वाच्यता कुठे केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडित तरुणीने आरडाओरड केल्यानं तिची आई, भाऊ हे घटनास्थळावर येताच त्यांनी आरोपीला पकडले. मात्र, तो पळून गेला. यानंतर पीडित तरुणीसह तिच्या नातवाईकांनी हसनाबाद पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात रितसर तक्रार दिली. या तक्रारीवरून हसनाबाद पोलिसांनी आरोपी समाधान पालोदे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या आरोपी फरार आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e