पुणे: पीएमपीच्या कंडक्टरकडून 17 वर्षीय तरुणीचा विनयभंग!

 Pmpml च्या स्वारगेट ते विश्रांतवाडी या मार्गावर प्रवास करणाऱ्या एका 17 वर्षीय तरुणीचा वाहकाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये (Bundgarden Police Station) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत किसन गोडगे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाहकाचे (Conductor) नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. फिर्यादी तरुणीची स्वारगेट ते विश्रांतवाडी या मार्गावर बसने (PMPL Bus) प्रवास करत होती. यावेळी आरोपी तिच्या बाजुला थांबला आणि मोठ्या आवाजात तिच्यावर ओरडला. परंतु फिर्यादी काहीच न बोलता बाजूलाच उभी राहिली. दरम्यान, काही वेळानंतर बसमध्ये आलेल्या तिकीट चेकरकडे (Ticket Checker) या तरुणीने वाहकाच्या वर्तनाविषयी सांगत तक्रार केली.दरम्यान, तिकीट चेकर निघून गेल्यानंतर फिर्यादीचा राग मनात ठेवत त्या आरोपीने तरुणीच्या कंबरेला हात लावला. तक्रारीनुसार, आरोपीने हा प्रकार तीन वेळेस केला. त्यानंतर घाबरलेल्या तरुणीने बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये याबद्दल तक्रार नोंदवली. पोलिसांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि त्या आरोपीला तातडीने अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e