नालासोपाऱ्यात आणखी एक गोळीबार ; सैराट सिनेमाच्या घटनेची पुनरावृत्ती

नालासोपारा परिसरात पुन्हा आणखी एक गोळीबाराची घटना समोर आली आहे. मागील आठवड्याभरातील ही तिसरी घटना आहे. यामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा  प्रश्न निर्माण झाला आहे.

नालासोपारा पूर्व संतोष भुवन परिसरातील शर्मावाडी परिसरात मेहुण्याने जावयाला दोन गोळ्या झाडून ठार करण्याचा पर्यंत केला आहे.  यात जावई बचावला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मेव्हण्याला तुळींज पोलिसांनी अटक केली आहे. सदरच्या घटनेने सैराट चित्रपटातील पटकथेची पुनरावृत्ती झाल्याची प्रचिती दिली आहे. शर्मावाडी संतोष भुवन या परिसरात राहणाऱ्या हितेन जोशी याने एका मुलीशी तिच्या घरच्यांचा विरोध जुमानत लग्न केले होते. यावरून मुलीच्या घराच्या मंडळीने त्याला धमाकावले होते. आठ महिन्यापूर्वी मुलीचा भाऊ दीपक गौतम याने हितेनला जीवेठार मारण्याची धमकी देऊन मारहाण केली होती. यावेळी हितेन ने पोलिसात तक्रार केल्याने दीपक शांत बसला होता. आणि हितेनचा काटा काढण्याचा कट रचत होता. शेवटी रविवारी त्याने संधी साधत बंदुकीतून दोन गोळ्या झाडत हितेनची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण हितेन यातून वाचला असून त्यावर उपाचार सुरु आहेत. त्याची स्थिती नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e