“मुख्यमंत्र्यांनी दोनदा फोन करून सांगितलं की…”; नारायण राणेंचा दिशा सालियान मृत्यू प्रकरणात खळबळजनक दावा!

 जवळपास दोन वर्षांपूर्वी घडलेल्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून राज्यात आता पुन्हा एकदा वादळ उठण्याची शक्यता आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या काही दिवस आधीच दिशा सालियानचा मृत्यू झाला होता. या प्रकरणावरून भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी केलेल्या गंभीर आरोपांसंदर्भात शनिवारी रात्री उशीरापर्यंत त्यांची मालवणी पोलिसांनी चौकशी केली. तब्बल ९ तास चौकशीनंतर नारायण राणेंनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये खळबळजनक दावा करण्यात आला आहे. कारण यामध्ये आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव राणेंनी घेतलं आहे.

“दिशाच्या आईला तक्रार करायला भाग पाडलं?”

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियानच्या आईला तक्रार करण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप राणेंनी केला. ” तिने आत्महत्या केली नसून, ती हत्या आहे हे आम्ही वारंवार बोलत होतो. त्यामुळे दिशाच्या आईकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर गेल्या, त्यांना तक्रार करायला प्रवृत्त केलं आणि तक्रार दिली अशी की आम्ही दिशा सालियानला न्याय मिळावी ही मागण आमची असताना, आई म्हणते की राणे पिता-पुत्राने पत्रकारपरिषदेत मांडलेल्या मुद्यांमुळे माझी बदनामी होतेय. अशी खोट तक्रार पोलिसांना दिली”, असं राणे म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांचा दोनदा फोन आला”

दरम्यान, यावेळी बोलताना नारायण राणेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “दिशा सालियानची ८ जून आणि सुशांतची १३ जूनला हत्या झाल्यानंतर मला मुख्यमंत्र्यांचा दोनदा फोन आला होता. आपण सुशांत आणि दिशाच्या केसबद्दल बोलू नका. एका मंत्र्याची गाडी होती असं बोलू नका. मी हे जबाबात सांगूनही हे वाक्य माझ्या जबाबातून वगळलेलं आहे. मी वारंवार सांगतोय की ते वाक्य टाका परंतु ते वगळलेलं आहे. याचाच अर्थ ही आजची केस राजकीय हेतून प्रेरित आहे. मुद्दाम आमच्यावर दबाव टाकण्याच प्रयत्न करत आहेत”, असा दावा राणेंनी यावेळी केला.

Disha Salian Case : “शेवटी मी गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला आणि त्यानंतर… ; नऊ तासांच्या चौकशीनंतर बाहेर आल्यावर राणेंचं माध्यमांसमोर विधान!

काय म्हणाले होते नारायण राणे?

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी काही दिवसांपूर्वी नारायण राणेंनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. “८ जूनला दिशा सालियानची बलात्कार करून हत्या केली. सांगितलं गेलं आत्महत्या केली. एक तर ती त्या पार्टीला जात नव्हती. तिला जबरदस्तीनं बोलावलं. तिचा मित्र रोहन राय यानं. त्यानंतर तिला थांबायला सांगितलं, ती थांबली नाही. ती घरी निघाली. त्यानंतर कोण कोण होते, पोलीस सुरक्षा कुणाला होतं, तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर पोलीस सुरक्षा कुणाची होती. तिच्या पोस्ट मॉर्टमचा अहवाल अजून बाहेर का आलेला नाही? ७ महिने झाले, अजून का बाहेर आला नाही? दिशा सालियान ज्या इमारतीत राहायची, त्या इमारतीच्या रजिस्टरची ८ जूनची पानं का नाहीत? कुणी फाडली?” असा सवाल राणेंनी केला होता.

वाचा नारायण राणेंची १९ फेब्रुवारीची सविस्तर पत्रकार परिषद…नेमकं काय म्हणाले राणे?

“सुशांतसिंहला जेव्हा कळलं, तेव्हा तो कुठएतरी बोलला की मी यांना सोडणार नाही. मग काही लोक त्याच्या घरी गेले. घरात जाऊन बाचाबाची झाली दिशा सालियानवरून. त्या बिचाऱ्याची हत्या करण्यात आली. तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी होती? त्या बिल्डिंगचे सीसीटीव्ही गायब कसे झाले? १३ जूनला रात्री सीसीटीव्हीचे कॅमेरे नव्हते. आधी होते असं सोसायटीतले लोक सांगतात. ठराविक माणसाची अँब्युलन्स कशी आली? ती कुणी आणली? रुग्णालयात कुणी नेलं? पुरावे नष्ट कुणी केले? याची चौकशी होणार. त्यात कोणते अधिकारी होते, तेही आता तिथे राहिलेले नाहीत. तेही आता सगळं उघडं करतील”, असा देखील आरोप नारायण राणेंनी १९ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e