शियावरील निर्बंध हे युद्धाच्या घोषणेसारखे; पुतिन यांचे मोठे वक्तव्य

 रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठा झापोरिझ्झिया अणुऊर्जाप्रकल्प शुक्रवारी ताब्यात घेतला. हा युरोपातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. युक्रेनशी झालेल्या तीव्र सैनिकी संघर्षांनंतर या प्रकल्पातील एका इमारतीस मोठी आग लावण्यात आल्याचा दावा युक्रेनने केला. आगीमुळे मोठय़ा आण्विक दुर्घटनेच्या धोक्याने जगभर भीतीची लाट पसरली होती. परंतु ही इमारत या प्रकल्पातील प्रशिक्षण केंद्र असून तेथील आग आटोक्यात आणण्यात आली. आगीनंतर या प्रकल्पातून किरणोत्सर्ग पसरलेला नाही, असा निर्वाळा संयुक्त राष्ट्रांच्या आण्विक प्रकल्पविषयक निरीक्षकांनी दिला.

दक्षिण युक्रेनमध्ये युद्धाची तीव्रता वाढली आहे. येथील मारियुपॉल, चेर्निहाइव्ह आणि खार्किव्ह येथे गोळीबार, क्षेपणास्त्र मारा सातत्याने सुरु आहे. खेर्सन शहरावर रशियाने ताबा मिळवला आहे. तर दुसरीकडे अझोव्ह समुद्रावरील मोक्याच्या बंदराच्या सीमेवर असणाऱ्या मारियुपोल शहरामध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. काळ्या समुद्राच्या बंदरातील स्थानिक सरकारी मुख्यालय रशियाने ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला युक्रेनियन अधिकाऱ्यांचा दुजोरा दिलाय. आठवड्याभरात युक्रेनमधून १० लाखांहून अधिक नागरिकांचे शेजारी देशांमध्ये स्थलांतर केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिलीय.भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी सांगितले की, रशियाने भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शेकडो बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि रशियन बाजूशी समन्वय साधण्यासाठी भारतीय दूतावासातील मुत्सद्दींचा एक गट बेलग्रेडला पाठवण्यात आला आहे. प्रश्न नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याचा आहे आणि रशियच्या बस त्या भागात जाऊ शकत नाही. आमच्या बसेस या भागांच्या जवळ आहेत. आम्हाला भारतीय नागरिकांचे सुरक्षित परतणे सुनिश्चित करावे लागेल.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e