झोपडपट्टी योजनेत फसवणूक झालेल्या महिलेचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात खोटे दस्तावेज तयार करून आपली झोपडी हडप करणाऱ्याला जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी पाठिशी घालत असल्याने त्रस्त झालेल्या एका महिलेने सोमवारी मंत्रालयात तिसऱ्या मजल्यावरून उडी  मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.

सध्या टिटवाळा येथे राहणाऱ्या रूपा मोरे यांची सायन येथे झोपडी होती. मात्र एका व्यक्तीने खोटय़ा कागदपत्रांच्या माध्यमातून ही झोपडी खरेदी केल्याचे सांगत झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात पक्के घर घेण्याचा प्रयत्न केला. मोरे कुटुंबियांनी याबाबत सायन पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. तरीही प्राधिकरणाचे अधिकारी दखल घेत नसल्याची या महिलेची तक्रार आहे. सबंधित अधिकारी आरोपीलाच पाठिशी घालत असल्याचा आरोप करीत मोरे यांनी मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान दाखवत नागरिकांनी  त्यांना वाचविल्याने अनर्थ टळला.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e