चोरींचा तपास लावण्यात सटाणा पोलिसांना यश

 मुद्देमालासह पाच जणांना अटक

नाशिक : सटाणा पोलिसांना विविध ठिकाणी झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास लावण्यात यश आले आहे. या कारवाईत आठ दुचाकी, शेतीसाठी उपयोगी सात रोटेव्हेटर, मारुती अल्टो मोटार अशा मुद्देमालासह पाच जणांना अटक करण्यात आली. न्यायालयाने संशयितांना दोन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.लखमापूर येथील ‘साई अ‍ॅग्रो’ आणि ‘हिरो कंपनी’च्या दुचाकी वाहनाच्या दालनातून शेती अवजारे आणि दुचाकी वाहनांची चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. या चोरीचा छडा लावण्याचे आव्हान सटाणा पोलिसांपुढे उभे ठाकले होते. यादरम्यान सटाणा शहरातील सिध्दी ऑटोमधून पल्सर गाडी तर विजय होंडा दालनातून शाईन चोरीला गेली. हे प्रकार रोखण्यासाठी सटाणा पोलिसांनी गुप्तचर विभागाच्या मदतीने तपास सुरू केला असता दऱ्हाणे येथील योगेश ऊर्फ सोन्या ठोके याचे नाव पुढे आले. त्याचा भ्रमणध्वनी पोलिसांनी तपासला असता मनमाडच्या आनंदवाडी येथील संजय गायकवाड या व्यक्तीशी वारंवार संभाषण झाल्याचे दिसले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर संशयितांनी चोरीची कबुली दिली.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सटाणा पोलिसांनी ब्राह्मणगाव येथील संदीप ऊर्फ उलशा सोनवणे, मध्य प्रदेश येथील राजेश शर्मा ऊर्फ राज बिहारीभैय्या यांना ताब्यात घेतले. विक्री केलेल्या वस्तू कुणाला विकल्या याचा शोध घेऊन चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान, कोणीही कोणतेही कागदपत्र तपासल्याशिवाय अथवा कमी किमतीत वस्तू मिळते म्हणून खरेदी करण्याचा प्रयत्न करू नये. तो देखील गुन्हा ठरू शकतो. खात्री केल्याशिवाय अथवा पोलिसांचा सल्ला घेतल्याविना कोणतीही वस्तू अनोळखी व्यक्तीकडून खरेदी करू नये, असे आवाहन सटाण्याचे निरीक्षक सुभाष अनमूलवार यांनी केले आहे.

नाशिकला चोराकडून २० दुचाकी जप्त

नाशिक शहराच्या विविध भागांतून दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गंगापूर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. त्याच्याकडून २० दुचाकी जप्त करण्यात आल्या. राहुल मुसळे ( ४४) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. गंगापूर पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना सिटी सेंटर मॉल परिसरात संशयित मुसळे येणार असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे गंगापूर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. या वेळी त्याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता मूळ कर्ज वसुलीचे काम करत असलेला संशयित राहुल मुसळे याला दुचाकी सोडविण्याचे पुरेपूर ज्ञान असल्याने त्याचा फायदा घेत त्याने शहर परिसरातून २० हून अधिक दुचाकी चोरल्याचे उघड झाले. काठे गल्ली, वडाळा, सिडको, उपनगर, मनमान या भागातुन दुचाकी जप्त केल्या आहेत. यामध्ये गंगापूर पोलीस ठाणेकडील एक, सरकारवाडा, इंदिरानगर, अंबड, भद्रकाली, या पोलीस ठाण्याकडील गुन्हे उघडकीस आणले आहेत. सहा लाख ६८ हजारांचा मुद्देमाल गंगापूर पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई गंगापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e