धक्कादायक! मुंबईच्या गर्दीने घेतला बळी; धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

  धावत्या लोकलमधूनपडून एका २२ वर्षाय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. बुधवारी सकाळीच ही दुर्दैवी घटना घडली आहे.आज सकाळी गोरेगाव ते मालाड स्थानकादरम्यान हा अपघात झाला असून बोरीवली रेल्वे पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आज सकाळच्या सुमारास लोकलमधून चर्चगेटच्या दिशेने जात असताना ही घटना घडली आहे.लोकलमध्ये सकाळच्या सुमारास चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. आजही सकाळीच लोकलला खूप गर्दी होती. त्यात हा २२ वर्षाय तरुण दरवाजाजवळ उभा होता. गोरेगाव ते मालाड स्थानकादरम्यान लोकलमध्ये चढणाऱ्या व उतरणाऱ्या प्रवाशांचा धक्का लागल्याने तो धावत्या लोकलमधून खाली पडला.लोकलमधून तरुण खाली पडल्याने एकच गोंधळ उडाला होता. प्रवाशांनी लगेच आरडा-ओरडा करत लोकल थांबवून तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मृत्यू झाला. बोरीवली रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती बोरीवली रेल्वे पोलिसांनी दिली आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e