मोठी बातमी : राजधानी दिल्ली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; सर्च ऑपरेशन सुरू

 नवी दिल्ली : दिल्ली शहरात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संस्थेने काही लोकांना ई-मेल पाठवत दिल्लीत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली. सदर लोकांनी याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी तातडीने ही माहिती दिल्ली पोलिसांना पाठवल्याने शहरातील विविध भागात मध्यरात्री सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेदहशतवाद्यांकडून हल्ल्याचा इशारा देण्यात आल्याने दिल्ली पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवला. तसंच सरोजनी नगर मार्केटसह इतर भागात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले.

सरोजनी नगर मार्केट बंद राहणार?

दिल्ली पोलिसांनी खबरदारी म्हणून सरोजनी नगर मार्केट परिसरात सर्च ऑपरेशन राबवल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर सरोजनी नगर मिनी मार्केट व्यापार संघटनेचे अध्यक्ष अशोक रंधवा यांनी मार्केट बंद केलं जाणार असल्याची माहिती दिली. दिल्ली पोलिसांच्या सूचनेनुसार मार्केट बंद करण्यात येणार असल्याचं रंधवा यांनी म्हटलं. मात्र मार्केट बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या नसल्याचा खुलासा दिल्ली पोलिसांकडून करण्यात आला आहे.दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची शहरात जोरदार चर्चा होत असून पोलिसांकडून ई-मेलद्वारे हल्ल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e