देवगिरी एक्स्प्रेसवर 8 ते 10 जणांचा सशस्त्र दरोडा, सिग्नलला कापड बांधून दरोडेखोरांनी थांबवली रेल्वे

चक्क सिग्नलला कापड बांधून रेल्वे थांबवून आठ ते दहा जणांच्या टोळीने लुटमार केल्याची माहिती मिळत आहे

औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर 8 ते 10 जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली आहे, मध्यरात्री दौलताबाद-पोटूळ दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. चक्क सिग्नलला कापड बांधून रेल्वे थांबवून आठ ते दहा जणांच्या टोळीने लुटमार केल्याची माहिती मिळत आहे. जवळपास अर्धा तास हा सगळा प्रकार सुरू होता. दरम्यान एक महिलेच्या गळ्यातील चैन आणि  इतर वस्तू चोरल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे,  रेल्वे डब्बा S5 ते S9 वर दगडफेक करण्यात आली असून घटनास्थळी ॲम्बुलन्स देखील उभी होती दरम्यान हे दरोडेखोर ॲम्बुलन्समधून आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे, 5 एप्रिल रोजी अशाच प्रकारे नंदीग्राम एक्स्प्रेस आणि नांदेड मनमाड पॅसेंजर रेल्वे थांबवून लुटमार केल्याची घटना घडली होती.
यापूर्वीही नंदीग्राम एक्स्प्रेस-नांदेड मनमाड पॅसेंजर रेल्वे थांबवून लुटमार 
औरंगाबाद येथे मुंबई-नांदेड नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वेगाडीला पोटूळ रेल्वे स्टेशनजवळ लाल दिवा दाखवून थांबवून रेल्वेत घुसलेल्या चार ते पाच दरोडेखोरांनी प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, तर मोबाईल हिसकावल्याची घटना घडल्यानंतर 5 एप्रिलला शुक्रवारी रात्री 12.55 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती देऊनही पोलीस यंत्रणा सक्रिय न झाल्याने रात्री पावणेतीन वाजेच्या सुमारास नांदेड-मनमाड या पॅसेेंजर रेल्वेला अशाच प्रकारे थांबवून दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून प्रवाशांना लुटल्याची दुसरी घटना घडल्याने प्रवाशांत खळबळ उडाली. याप्रकरणी औरंगाबाद लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मुंबईहून औरंगाबाद मार्गे नांदेडला निघालेली नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वेगाडी शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास लासूर स्टेशन येथून औरंगाबादकडे येत होती. त्यावेळी देखील पोटूळ रेल्वे स्टेशन येथील ग्रीन सिग्नलला दरोडेखोरांनी कपडा बांधून झाकले. यामुळे केवळ लाल सिग्नल रेल्वे मोटारमनला दिसल्याने स्टेशनजवळच चालकाने गाडी थांबविली. गाडी थांबताच धारदार शस्त्रे घेऊन रेल्वेतील एका डब्यात घुसलेल्या दरोडेखोरांनी प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करण्यास सुरुवात केली होती.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e