राम कुमार यादव ( वय ५५), त्यांची पत्नी कुसुम देवी (वय ५२), मुलगी मनीषा (वय २५), सून सविता (वय २७) आणि नात मीनाक्षी (वय २) अशी खून झालेल्यांची नांवे आहेत. तर दुसरी नात साक्षी ( वय ५) आहे. हे हत्याकांड कोणी व का केले, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. प्रयागराजचे डीएम आणि एसएसपी आणि इतर पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. डोक्यावर जबर मारहाण करून सर्वांचा खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तर तरुणीवर बलात्कार झाल्याच्या संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच या घटनेचा उलगडा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, याआधी १६ एप्रिलला प्रीती तिवारी ( वय ३८) आणि तिच्या तीन मुली माही (वय १२), पिहू (वय ८) आणि कुहू (वय ३) यांची प्रयागराजमधील नवाबगंजमधील खगलपूर गावात गळा चिरून हत्या केली होती.पती राहुल तिवारी (वय ४२) लटकलेले आढळून आले होते. ही घटना ताजी असतानाच आता एकाच कुटुंबांतीव पाच जणांची हत्या झाल्याने प्रयागराजमध्ये खळबळ उडाली आहे.
0 Comments