नाशिक : बाजार समितीच्या आवारातच दुचाकी पेटली ; चालक...

नाशिक-
नांदगाव बाजार समितीच्या आवारात हमाल जॉन वाघ यांच्या गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. यावेळी बाजार समितीच्या कर्मचा-यांनी दुचाकी विझविण्यासाठी मदत केल्याने पुढील अनर्थ टळला.
आज (दि. 19) दुपारच्या सुमारास वाघ यांनी गाडीत 50 रुपयांचे पेट्रोल टाकून गाडी बाजार समितीच्या आवारात आणली असता, गाडीतून धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ दुचाकी उभी करुन ते बाजूला झाले. तेवढ्यात गाडीने पेट घेतला. वाघ यांनी काही दिवसांपूर्वीच दीड लाखांना दुचाकी घेतली होती.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e