पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यंकटी बालाजी गायकवाड (रा.बारड, जि.नांदेड), अनिरुद्ध ऊर्फ बाळू भारत मिसाळ (रा.औरंगाबाद), फारुक अहेमद खान (रा. नागपूर) व हुसेन नासर शेख (रा. मालटेकडी रोड, नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत. कर्नाटकातील सिमोगा येथील न्यू डायमंड ट्रान्सपोर्ट कंपनीचे मॅनेजर पीर बेग अब्दुल्ला बेग यांनी त्यांच्या ओळखीचा ट्रक चालक व्यंकटी बालाजी गायकवाड यास दिल्ली येथील शर्मा इन्टरप्राईजेस यांना पोहोचवण्यासाठी सुमारे 35 लाख 52 हजार 500 रुपयांची सुपारी परस्पर लुबाडल्याची तक्रार दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी व्यंकटी बालाजी गायकवाड याला पोलिसांनी लातुर येथे अटक केली
दरम्यान, या गुन्ह्यातील (एमएच 26 व्हीई 3965) हा चोरी गेलेला ट्रक औरंगाबाद येथे सापडला. त्यावरुन पोलिस औरंगाबादला दाखल झाले. तिथे या प्रकरणातील मुख्य आरोपी व्यंकटी गायकवाड याचा मित्र अनिरुध्द ऊर्फ बाळू भारत मिसाळ हा मिळून आला. त्याची चौकशी केली असता ट्रकमधील माल पूर्णा (ता.भिवंडी) येथे विकण्यासाठी नेण्यात आल्याचे त्याने सांगितले व तिथे छापा टाकला असता साडेतीनशे पोते सुपारी पोलिसांच्या हाती लागली. सदर जप्त माल लातूर येथे आणला आहे. सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याचे बावकर यांनी सांगितले.
0 Comments