पुण्यात दहशत माजवणाऱ्या कोयता गँगची धिंड? म्होरक्यासह सात जणांच्या मुसक्या आवळल्या

सलमान शेख आणि त्याच्या सहा साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. सहकार नगर पोलिसांनी आरोपींची धिंड काढल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

पुण्यातील सहकार नगर परिसरात दहशत माजवणाऱ्या (Pune Crime News) कोयता गँगची पोलिसांनी धिंड काढल्याचा दावा केला जात आहे. नुकतंच पोलिसांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या गँगच्या (Criminal Gang) मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर सहकार नगर पोलिसांनी आरोपींची ‘वरात’ काढल्याचं समोर आलं आहे. हातात कोयते घेऊन तरुणांना धमकावण्याचे प्रकार सुरु होते. एका तरुणाला दोन दिवसांपूर्वी मारहाण झाल्याचं उघडकीस आलं होतं. त्यानंतर सलमान शेख आणि त्याच्या सहा साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. सहकार नगर पोलिसांनी आरोपींची धिंड काढल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

काय आहे प्रकरण?

बालाजी नगर येथील रजनी कॉर्नर परिसरात धारदार हत्यार हातात घेऊन दहशत पसरावली जात आहे. हातात कोयते घेऊन नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. फुकट भाजी दिली नाही म्हणून मारहाण केली जात आहे, पाया पडायला लावलं जात आहे आणि या घटनांचे व्हिडीओ शूट करुन दहशत पसरवली जात आहे. याबाबत नागिरकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. परंतु पुणे पोलिस कडक कारवाई करत नसल्याचं बोललं जात होतं.

बालाजीनगरमधले अट्टल चोर धारदार हत्याराने नागरिक आणि लहान मुलांना त्रास देण्याचं काम करत होते. रस्त्यावर महिला जात असताना छेडछाड करणे, व्हिडीओ काढणे अशा पद्धतीची दहशत पसरवत होते. परिसरातील नागरिकांनी सहकारनगर पोलिस स्टेशनकडे वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत. मात्र त्यांना पोलिसांचीही भीती उरली नसल्याचं स्थानिक सांगत.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e