जामनेर-बोदवड रस्त्यावरील राजकमल हॉटेल समोर सार्वजनिक रस्त्यावर संशयित आरोपी अनुराग लक्ष्मण सूनगत (20, रा.सिव्हील हॉस्पिटल क्वार्टर, वरणगाव) हा तरुण हातात गावठी पिस्तूल घेऊन दहशत निर्माण करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उ.नि.अमोल देवढे, सफो अशोक महाजन, पोहेका लक्ष्मण पाटील, पोना. विनोद पाटील, पोना किशोर राठोड, पोना रणजीत जाधव, पोना श्रीकृष्ण देशमुख, पो.काँ.ईश्वर पाटील, चा.पो.काँ. अशोक पाटील यांच्या पथकाने सापळा रचून संशयित आरोपी अनुराग लक्ष्मण सुनगत (वरणगाव) यास अटक केली.
0 Comments