पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे गेरसे खडवली, कल्याण येथे खरेदी केलेल्या जमिनीवर अधिकार अभिलेखात सातबारावर नाव दाखल करून देण्यासाठी राजेंद्र बो-हाडे यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार बोऱ्हाडे यांना अटक करण्यात आली. तर त्यांचा खासगी सहाय्यक निलेश चौधरी याच्यावर लाचेच्या मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments