जळगाव पुन्हा खुनाने हादरले, शिवाजीनगरात तरूणाची हत्या

जळगाव शहरात पुन्हा खून झाल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपुर्वी जळगाव शहरात दोन खून झाल्याने खळबळ माजली होती. ही घटना ताजी असतानाच काल रात्री पुन्हा खून झाल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान चोऱ्या आणि दरोड्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कारवाई बाबत नाराजी व्यक्त केली आहे. 

सोमवारी रात्री शिवाजीनगर हुडकोजवळ मोहम्मद मुसेफ शेख इसाक (वय-४० रा.हुडको) याचा खून झाला. मागच्या काही दिवसांतील हा तीसरा खून असल्याने शहरात खुनाची मालिका सुरूच आहे.

शिवाजीनगर हुडको परिसरातील मोहंमद मुसेफ शेख इसाक (वय ४०, रा. शिवाजी नगर) यांच्यावर रात्री साडेआठच्या सुमारास चॉपर हल्ला झाला. यात मोहंमद यांचा मृत्यू झाला असून हल्लेखोर फरार झाला आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e