नागपुरात एक १७ वर्षीय मुलगी गर्भवती होती. पाच महिने झाल्यानंतर ही बाब तिच्या लक्षात आली. त्यानंतर तिने युट्यूबवर व्हिडीओ पाहून गर्भपात केला. पण, प्रकृती खराब झाल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
नागपूर तालुक्यातील एका गावातीव हे प्रकरण आहे. सतरा वर्षीय मुलीचे एका २७ वर्षीय युवकासोबत सूत जुळले होते. दोन वर्षांपासून त्याचे प्रेम प्रकरण सुरू असल्याची माहिती आहे. वर्षभरापूर्वी तो युवक नागपुरात कामानिमित्त आला. एमआयडीसी परिसरात भाड्याने खोली करून राहू लागला
त्यामुळे त्यांच्या भेटीगोटी कमी झाल्या. पण, तरीही ते संधी मिळेल तेव्हा भेटत होते. कधी-कधी हा युवक नरखेडला जात असे, तर कधी-कधी ती नागपूरला येत असे. काही दिवसांपूर्वी ती नागपूरला आली. रात्री त्याच्या खोलीवर थांबली. दोन-तीन दिवस ती इकडं थांबली होती. त्यावेळी त्यांच्यात शरीरसंबंध निर्माण झाले. यातून तिला गर्भधारणा झाली. मळमळ, उलटीचा तिला त्रास होऊ लागला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
0 Comments