नंदुरबार : आपले पीक वाचवण्यासाठी शेजारच्या शेतात आग विझवायला गेलेल्‍या शेतकऱ्याचा जळून मृत्‍यू

शेजारच्या शेताला लागलेली आग आपल्या शेतात येऊ नये म्हणून आग विझवायला शेतकरी शेतात गेला. मात्र हा शेतकरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जागीच मरण पावला. ही दुर्देवी घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात घडली.या विषयी अधिक माहितीनुसार, शहादा तालुक्यातील बामखेडा गावातील गणेश उखा पटेल यांचे गट नंबर एकशे अठ्ठावीस क्रमांकाचे शेत आहे. त्या शेतावरून गेलेली विजेची तार तुटल्यामुळे आज (सोमवार) दुपारी शेतातील उसाच्या पिकाला आग लागलीत्या शेजारी संजय एकनाथ चौधरी आणि त्यांचे बंधू रोहिदास एकनाथ चौधरी यांचेही शेत असून, यांच्या शेतातील उभे गव्हाचे पीक ऊसाला लागलेल्या आगीमुळे धोक्यात येण्याचा संभव होता. म्हणून संजय चौधरी हे उसाच्या शेतात धावून गेले व आग विझविण्याचा प्रयत्न करू लागले. या दरम्यान चौधरी यांचा या आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. पोलीस पाटील डॉक्टर योगेश चौधरी, सरपंच चौधरी यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. शहादा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e