धनवाडी (ता. चोपडा) येथील मुळ रहिवासी असलेला धनंजय बाविस्कर हा गेल्या दोन वर्षांपासून पत्नी उज्ज्वलासह कुसूंबा येथे (Jalgaon News) वास्तव्याला होता. याच गावात धनंजयची बहिण शुभांगी आणि मेहुणे दिपक पाटील देखील राहतात. एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरीला होता. दरम्यान अक्षयतृतीयेच्या निमित्ताने पत्नी उज्ज्वला माहेरी गेली असल्याने धनंजय हा घरी एकटाच होता. शनिवारी २३ एप्रिल रोजी रात्री १० वाजता बहिण शुभांगीकडे जेवण केले आणि तो त्याच्या घरी निघून आला.
सकाळी दार न उघडल्याने आली शंका
मध्यरात्री धनंजयने रूमालाने गळफास घेवून आत्महत्या केली. आज सकाळी बराच वेळ झाला तरी धनंजय उठला नाही; यामुळे शेजारी राहणाऱ्यांना शंका आली. शुभांगी ह्या घरी आल्यावर भावाने गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Jalgaon Medical Collage) दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महेंद्र गायकवाड, नरसिंग पाडवी हे करीत आहे. शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मयताच्या पश्चात पत्नी उज्वला, आई, वडील व बहिण असा परिवार आहे.
0 Comments