राणा दाम्पत्याविरोधात पुण्यात काँग्रेसकडूनही तक्रार दाखल

राणा यांनी दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल असे वर्तन आणि वक्तव्य केल्याचा गुन्हा पोलिसांनी राणा दांपत्यांवर दाखल केला आहे.

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या बंगल्यासमोर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा इशारा नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दिल्याने शुक्रवारपासून राणा विरुद्ध शिवसेना (Rana Vs Shivsena) वाद टोकाला पोहचला होता. राणा यांनी आपल्या घरातून माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधानं करत दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल असे वर्तन आणि वक्तव्य केल्याचा गुन्हा पोलिसांनी राणा दांपत्यांवर दाखल केला आहे. दरम्यान राणा दाम्पत्याला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

मात्र, राणा दाम्पत्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात काँग्रेस (Congress) प्रवक्त्या संगिता तिवारी यांनी राणा यांच्या विरोधातील दुसरी तक्रार दाखल केली आहे. याआधी शिवसेनेकडून समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्यानं हा गुन्हा दाखल करण्याची मागणी संगिता तिवारी यांनी केली आहे. दरम्यान, तक्रारदाराला जबाब नोंदवण्यासाठी उद्या पोलीस स्टेशनला हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता पुण्यातही रवी राणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे आणि तो नोंद झाला तर राणा यांच्या अडणीच आणखी वाढ होणार आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e