पोटच्या बाळाची केली आईने हत्या; सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील घटना

सातारा : पाच महिन्याच्या चिमुकल्या मुलाचा ब्लँकेटमध्ये गुंडाळून, उशीने नाक व तोंड दाबुन जन्मदात्या आईनेच खून (Crime) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना तरडगाव (ता. फलटण) येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. मात्र या घटनेचे नेमके कारण अजुनही समजू शकलेले नाही.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तरडगाव (ता. फलटण) येथील पांढरी येथील सौ.आरती सोमनाथ गायकवाड या महिलेने लोणंद पोलीस ठाण्यात स्वतः फोन करुन तिच्या पाच महिण्याच्या लहान बाळाला ( मुलगा) १२ एप्रिल २०२२ रोजी दुपारी दोन वाजता जिवे मारुन पुरले असल्याची माहिती दिली.

त्यावरून लोणंद पोलिसांनी (Police) तिचेकडे जावुन खात्री केली असता तिने तिचा पाच महिण्याचा लहान मुलगा कार्तिक सोमनाथ गायकवाड यास ब्लँकेटमध्ये गुंडाळून, उशीने नाक व तोंड दाबून जिवे ठार मारुन खून केल्याचे सांगितले. या खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e