अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, कांदिवली (पूर्व), तसेच पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ११, मुंबई, सहाय्यक पोलीस आयुक्त, बोरिवली विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर, एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे यांच्या थेट देखरेखीखाली गुन्हे प्रकटीकरण पथक, निगराणी पथक, एटीसी पथक यांची स्वतंत्र पथके तयार करून त्यांना याबाबत कारवाई करण्यास आदेशित करण्यात आले.
त्याप्रमाणे काल गुन्हे प्रतिबंधक गस्तीदरम्यान गस्त घालताना पोलीस निरीक्षक किरण सुरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडके, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदिप साळवे आणि पथकाने बोरिवली पश्चिम येथील सेंट फ्रांसिस शाळेजवळ, दहिसर नदिकिनारायेथे उभ्या असलेल्या एका महिलेच्या हालचाली संशयीत वाटल्या तसेच तिच्या हातातील छोटया पारदर्शक पिशवीत कोणतीतरी संशयास्पद वस्तू असल्याचा सुगावा लागला.
या महिलेने पोलीस पथकास पाहिले आणि ती तेथून निघून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तिला शिताफीने ताब्यात घेतले.या महिलेस पोलिसांनी हिंदी भाषेत संभाषण करून यह बॅग किसका है और उसमे क्या है ? याबाबत विचारणा केली असता तिने तीच्या जवळील पिशवी ही स्वतःची असल्याचे सांगून त्यामध्ये हिरॉईन हा अमली पदार्थ असल्याचे सांगितले. अमली पदार्थाची विक्री करण्याकरीता ती या ठिकाणी आली असल्याचे तिने सांगितले.
महिलेकडून जप्त केलेल्या हेरॉईनचे वजन 345 ग्रॅम असून त्याची किंमत ५१ लाख ७५ हजार आहे. आरोपी मुस्कान दिपक कनोजीया अमली पदार्थ विक्री करण्यास परवानगी नसताना देखील अमली पदार्थ विक्री करण्यासाठी स्वत: जवळ बाळगले म्हणून आरोपी महिलेविरूध्द एम एच बी कॉलनी पोलीस ठाण्यात कलम-8 (क) सह 21 (क) एन. डी. पी. एस अॅक्ट 1985 अन्वये गुन्हा नोंद करून नमूद महिलेस गुन्हयात अटक करण्यात आली.
0 Comments