एरंडोल तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहितेने बदनामीला कंटाळून आत्महत्या (suicide) केली आहे.
जळगाव, 24 एप्रिल : जळगावच्या (Jalgaon) एरंडोल तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहितेने बदनामीला कंटाळून आत्महत्या (suicide) केली आहे. या घटनेमुळे महिलेच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्येच्या घटनेनंतर संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली होती. महिलेने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरातील अनेक नागरिकांना धक्का बसला. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता त्यांना महिलेची सुसाईड नोट मिळाली. त्यामध्ये महिलेने आपल्या कुटुंबाला आत्महत्येस दोषी ठरवू नये, असं म्हटलं आहे. तसेच आपण बदनामीला कंटाळून आत्महत्या केल्याचं महिलेने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
संबंधित घटना ही एरंडोल येथील जहांगीरपुरा परिसरात घडली आहे. रुपाली विश्वनाथ पाटील असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. महिलेने आज दुपारी घराच्या दुसऱ्या मजल्यावर पंख्यास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. महिलेच्या कुटुंबियांनी आक्रोश सुरु केला. त्यानंतर संबंधित बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. पोलिसांना या घटनेची बातमी मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली पाटील यांनी दुपारी घरात कुणी नसताना गळफास घेतला. पोलिसांनी त्यांना खाली उतरवून एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेबाबत एरंडोल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांनी घराची झळती घेतली असता त्यांना मृतक महिलेने लिहिलेली सुसाईड नोट मिळाली. त्यामध्ये महिलेने आपल्या आत्महत्येमागील कारण लिहिलं आहे. "माझ्या मृत्यूबद्दल घरच्यांना दोषी ठरवू नये. मी बदनामी सहन नाही करु शकले. माझ्या पर्समधील सर्व कमाई माझ्या मुलामुलींची असून त्यांना सांभाळून घ्या", असा मजकूर पोलिसांना सापडलेल्या पत्रामध्ये आहे.
0 Comments