मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम लालू भिरूड (वय-५३) रा. डोंगरकठोरा ता. यावल हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते डोंगरकठोरा ग्रामपंचायतीचे माजी सदस्यहोते. कर्जबाजारीपणामुळे ते त्रस्त होते. बुधवारी १३ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास डोंगरकठोरा शिवारातील सातोद रस्त्यावरील दिलीप भिरूड यांच्या शेतातील विहिरीत उडी घेवून त्यांनी आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली
होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी विहीरीच्या काठावर आपला चष्मा, शर्ट व चपल ठेवल्याचे दिसून आले. गावातील ग्रामस्थांच्या व तरूणाच्या मदतीने अखेर विक्रम भिरूड यांचे मृतदेह विहीरीतून काढून यावल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या संदर्भात मयताचे लहान भाऊ सुनिल भिरुड यांनी
खबर दिल्याने यावल पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

0 Comments