मुंबई - शिवसेना (Shivsena) खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी भावना गवळी (Bhavana Gawali) यांना ईडीकडून समन्स बजाव
ण्यात आले आहे. गवळी यांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या समन्समधून देण्यात आले आहेत. तसेच, चौकशीसाठी हजर न झाल्यास ईडी अजामिनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता असल्याचीही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यापूर्वी देखील ईडीने भावना गवळी यांना 3 वेळा समन्स पाठवली होती. मात्र, त्या एकदा देखील चौकशीला हजर राहिल्या नव्हत्या
भावना गवळी या अनेक दिवसांपासून ईडीच्या रडारवर आहेत. याआधी सप्टेंबर महिन्यात गवळी यांच्या पाच संस्थांवर ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणात सईद खान या व्यक्तीला अटक केली होती. सईद खान यांच्या चौकशीत बाहेर आलेल्या माहितीच्या आधारे गवळी यांना याआधी 4 ऑक्टोबरला समन्स बजावले होते. त्यानंतर गवळी यांना 15 दिवसांनी पुन्हा समन्स बजावले होते. पण त्यावेळीसुद्धा गवळी या चौकशीला अनुपस्थित राहिल्या होत्या. त्यानंतर बजावण्यात आलेल्या तिसऱ्या समन्सनंतरही भावना गवळी चौकशीसाठी हजर झाल्या नव्हत्या.
भावना गवळी यांच्यावर बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. ईडीनं भावना गवळी यांच्या वाशिम-यवतमाळ येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये अनेक कागदपत्रे जप्त केली होती.
खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्था आणि कृषी उत्पादन संस्थांवर 30 ऑगस्टला ईडीने ED छापेमारी केली होती. जवळपास नऊ ठिकाणी ही छापेमारी Raid करण्यात आली होती. तसेच बालाजी पार्टीकल बोर्ड या कारखान्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप खासदार गवळींवर आहेत.

0 Comments