टवाळखोरांची मस्ती इतकी चढली होती की, त्यांनी समज देणाऱ्या विद्यार्थिनीची पुन्हा छेड काढली. एका बहाद्दराने आपल्या तोंडातील गुटखा मुलीच्या पायावर थुंकला. त्यानंतर पुन्हा विद्यार्थिनी जाब विचारायला गेल्या. तेव्हा त्याने त्यांना धक्के मारायला सुरुवात केली. एका मुलाने तर चक्क हात उगारला. त्यानंतर मात्र...
टवाळखोरांची मस्ती इतकी चढली होती की, त्यांनी समज देणाऱ्या विद्यार्थिनीची पुन्हा छेड काढली. एका बहाद्दराने आपल्या तोंडातील गुटखा मुलीच्या पायावर थुंकला. त्यानंतर पुन्हा विद्यार्थिनी जाब विचारायला गेल्या. तेव्हा त्याने त्यांना धक्के मारायला सुरुवात केली. एका मुलाने तर चक्क हात उगारला. त्यानंतर मात्र, मुलीच्या संयमाचा बांध सुटला. त्यांचा रुद्रावतार पाहून या मुलांची पळता भुई थोडी झाली.
पोलिसांनीही दिला दणका
भोसला मिलिटरी स्कूलमध्ये विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे दिले जातात. विद्यार्थिनींना त्याचा इथे उपयोग केला. त्यांनी या टवाळखोरांना अक्षरशः धू-धू धुतले. त्यातील एकाने आपल्या फोनवरून इतर मुलांना फोन करून बोलावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलींनी त्यालाही अद्दल घडवली. थेट पोलिसांच्या 100 क्रमांकावर डायल करून मदत मागवून घेतली. त्यानंतर पोलिसांनीही त्यांचा पाहुणचार केला. या मुलींसमोरच टवाळखोरांना उठाबशा काढायला लावल्या. या प्रकारानंतर मुलींनी वसतिगृहाकडे धाव घेतली.
पालकांनो लक्ष द्या…
पालकांनो आपल्या मुलाकडे जरूर लक्ष द्या. या टवाळखोरांमध्ये आपला मुलगा तर नाही ना, याची खात्री करून घ्या. त्यांना चांगल्या सवयी लावा. महिला घरातील असो की, बाहेरची. नातेलगांमधील असो की, दूरची. त्यांचा सन्मान करायला आणि आदर ठेवण्याचे धडे त्यांंना जरूर द्या. अन्यथा असे काही होऊन बसेल की, तुम्हाला मानही वर काढता येणार नाही, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
0 Comments