नेपाळी मुलीची विक्री….
पोलिसांनी सुटका केलेल्या पीडित मुलींपैकी एक मुलगी नेपाळची आहे. ती पुण्यामध्ये डीजे ऑपरेटरचे शिक्षण घेत होती. तिची मोठी बहीण कोल्हापूरमध्ये राहण्यास होती. २०१९ मध्ये फ्रेन्डशिप डे निमित्त आयोजित एका पार्टीसाठी ती कोल्हापुरात आली होती. ती मेकअपसाठी ताराबाई पार्कातील पार्लरमध्ये गेली असता आरोपी मनिषा कट्टे हिने ‘तु दिसायला छान आहेस, तुला जॉबपेक्षा जास्त पैसे मिळतील’ असे आमिष दाखवले. तिला पाचगाव येथील बंगल्यात नेवून आरोपी सरिताची ओळख करून दिली. त्यानंतर पीडित मुलीला जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्यास भाग पाडले. तसेच मनिषाने तिची सरीता पाटील हिला विक्री केल्याचेही समोर आले.
वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा
दुसरी पीडित मुलगी ही अत्यंत गरीब घरातील आहे. तसेच तिचे वडील नेहमी आजारी असल्याने त्यांच्या औषधोपचारामुळे तिला अडचणी होत्या. तीदेखील पार्लरच्या निमित्ताने आली असता सरीता पाटील हिच्याशी ओळख झाली. सरीता पाटील आणि विवेक दिंडे या दोघांनी तिला कळंबा येथील फ्लॅटवर नेवून वेश्याव्यवसायासाठी भाग पाडले.
हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्यात आला. सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी दोन्ही पीडित मुलींसह एकूण अकरा साक्षीदार तपासले. पीडित मुलीनी चारही आरोपी विरुध्द घडलेली घटना सविस्तरप्रमाणे सांगितली. या दोन्ही मुलींची साक्ष, वैदयकीय अधिकारी डॉ वृषाली यादव, डॉ. मोहिनी देशपांडे, आशिष मोरे व डॉ शैलेश पाटील यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. साक्षीदारांचे जबाब व सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राहय मानून न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली. तपासकामी पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सागर पोवार, महिला कॉन्स्टेबल माधवी घोडके, ॲड. वंदना चिवटे यांनी सरकारी पक्षाला मदत केली.
0 Comments